मुंबई – आलिया भट्टच्या “सडक 2′ चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नव्या पोस्टरद्वारे चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.
आलिया भट्टने सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत प्रदर्शनाच्या तारखेविषयी माहिती दिली आहे. तर आता या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये प्रत्येक भूमिकांची ओळख करण्यात आली असून कथेची झलक पाहायला मिळते. या ट्रेलरमध्ये संजय दत्तसह आलिया भट्ट आणि आदित्य रॉय-कपूर गिटार आणि बॅग घेऊन रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.
1991च्या “सडक’ या चित्रपटाचा हा सिक्वल आहे. यात पूजा भट्ट आणि संजय दत्तची जोडी दिसली होती, तर “सडक 2’मध्ये ही जोडीही एका खास भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
दरम्यान, महेश भट्ट यांनी 21 वर्षांनंतर “सडक 2’मधून पुन्हा दिग्दर्शकाची जबाबदारी पार पडली आहे. त्याचबरोबर चित्रपटाची कथाही त्यांनीच लिहिली आहे. यापूर्वी त्यांनी 1999 साली “कारतूस’ हा शेवटचा चित्रपट दिग्दर्शित केला होता.