भोर -भोर तालुक्यात (दि.9) शहर 7, म्हाळवडी 5, भोंगवली 2, माझगांव 2, व भोलावडे येथील 1, माझगाव 1, वेळू 1, करंदी खे. बा. 1, रांजे 1, अशा 21 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
भोर, नसरापूर व पुणे येथे 80 बाधितांवर उपचार सुरू असल्याचे गट विकास अधिकारी विशाल तनपुरे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनी सांगितले.
आजअखेर आकडा 282 वर पोहोचला आहे. यातील 195 जणांनी करोनावर मात केली असून त्यांना घरी सोडले आहे.11 जणांचा करोनाने बळी घेतला असून 922 जणांची र्स्वब तपासणी केली आहे.