लखनौ – उत्तर प्रदेश राज्य सुन्नी केंद्रीय वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जुफर अहमद फारुकी यांनी बुधवारी अयोध्येत पाच एकर जागेवर मशिदीच्या बांधकामासाठी ट्रस्ट स्थापन करण्याची घोषणा केली. आपण स्वतः या ट्रस्टचे मुख्य विश्वस्त आणि अध्यक्ष असणार असल्याचे ते म्हणाले.
आम्ही इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन या नावाने विश्वस्त संस्था बनविली आहे. अयोध्याच्या धन्नीपूर गावात मंडळाला देण्यात आलेल्या पाच एकर जागेमध्ये मशीद, इंडो-इस्लामिक रिसर्च सेंटर, ग्रंथालय आणि रुग्णालय बांधण्याचे काम हा ट्रस्ट बघेल, असे फारुकी यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अयोध्येतील वादग्रस्त जागेवर ट्रस्टच्या माध्यमातून राममंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा केला होता आणि नवीन मशिदीच्या बांधकामासाठी उत्तर प्रदेशातील प्रमुख ठिकाणी
सुन्नी वक्फ बोर्डाला पर्यायी 5 एकर भूखंड देण्याचे निर्देश केंद्राला दिले होते.