राज्यात उच्चांकी वाढ

मुंबई- राज्यात दिवसभरात 11 हजार 147 नवीन करोनाबाधित रुग्णांची उच्चांकी भर पडली आहे. यासोबत एकूण करोनाबाधितांचा आकडा 4 लाख 11 हजार 789वर पोहोचला आहे. यापैकी 2 लाख 48 हजार 615 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 1 लाख 48 हजार 150 ऍक्‍टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज 266 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.58टक्के इतका आहे.

दिवसभरात 8 हजार 860 रुग्णांना बरे झाल्यास घरी सोडण्यात आले आहे. राज्यातील रिकव्हरी रेट सध्या 60.73 टक्के इतका आहे. राज्यात 9 लाख 4 हजार 141 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 40 हजार 546 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.