सातारा -जिल्ह्यात एकाच दिवसातील आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे 135 जणांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. पाच करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या 3338 झाली आहे. तर करोनामुळे आतापर्यंत 119 जणांचा बळी गेला आहे.
जिल्ह्यात सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 135 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तसेच दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. या 135 करोनाबाधित रुग्णांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे. खंडाळा तालुक्यातील जवळे येथील 20 वर्षाची महिला,
15 वर्षाचा युवक, पाडेगाव येथील 38, 70, 60 वर्षीय महिला, विंग येथील 55, 70, 36, 26, 26 वर्षीय महिला, 65, 52, 25 वर्षीय पुरुष, बालाजी विश्व, शिरवळ येथील 26 वर्षीय पुरुष, पळशी येथील 3 वर्षाची बालिका, जवळे येथील 38, 48 वर्षाची महिला, स्टार सिटी, शिरवळ येथील 42 वर्षाची महिला, पाडेगाव येथील 48 वर्षाचा पुरुष, खंडाळा येथील 64 वर्षाचा पुरुष, लोणंद येथील 65 वर्षीय महिला (मृत्यू)., जावळी तालुक्यातील रायगाव येथील 43, 36 वर्षीय पुरुष, 34, 32 वर्षीय महिला,
पुनवडी येथील 70 वर्षीय पुरुष., खटाव तालुक्यातील बनपुरी येथील 51 वर्षीय पुरुष, वडूज येथील 45, 20, 22, 42, 22, 50 वर्षीय महिला, 52, 24, 61, 60, 20, 47, 31 वर्षीय पुरुष, पाचवड येथील 40 वर्षीय पुरुष, विसापूर येथील 13 वर्षाची युवती, 13 वर्षाचा युवक, 38, 40 वर्षाचा पुरुष, 24, 37, 16 वर्षाची महिला, निढळ येथील 31 वर्षीय महिला., पाटण तालुक्यातील कासरुंड येथील 35, 17 वर्षीय महिला, 12 वर्षाची युवती, निगडे येथील 45, 78 वर्षीय पुरुष, 60 वर्षाची महिला, जाधववाडी, चाफळ येथील 25, 2 वर्षाची बालिका, चाफळ येथील 61 वर्षीय महिला, 28 वर्षीय पुरुष, 6 वर्षाचा बालक, नेरले येथील 7 वर्षाची बालिका, 50, 20, 48 महिला, 20 वर्षाचा युवक,
37, 25 वर्षीय पुरुष, मल्हारपेठ येथील 28 वर्षीय पुरुष, खाले येथील 50 वर्षीय महिला., वाई तालुक्यातील पसरणी येथील 45 वर्षीय पुरुष, 18, 16 वर्षाचा युवक, 45 वर्षाची महिला, बोरगाव येथील 36 वर्षीय पुरुष, रेणावले येथील 28 वर्षीय पुरुष, सिध्दांतवाडी 30 वर्षीय महिला, काझी कॉलनी, वाई 30 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष, फुलेनगर येथील 40 वर्षीय पुरुष, माऊलीनगर येथील 45 वर्षीय पुरुष, सोनगीरवाडी येथील 35 वर्षीय पुरुष, रविवार पेठेतील 30 वर्षीय पुरुष, शहाबाग येथील 53 वर्षीय पुरुष, वाई येथील 55 वर्षीय पुरुष., फलटण तालुक्यातील कोळकी येथील 28 वर्षीय पुरुष,
राजाळे येथील 42 वर्षीय पुरुष., कराड तालुक्यातील रविवार पेठेतील 72 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 24 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, कराड येथील 33, 40 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठेतील 54 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 31, 57, 25 वर्षीय पुरुष, 2 वर्षाचे बालक, 25 वर्षीय महिला, कालवडे येथील 35, 23 वर्षीय पुरुष, वडगाव हवेली येथील 22 वर्षीय पुरुष, बुधवार पेठेतील 55 वर्षीय पुरुष, शनिवार पेठेतील 52, 35 वर्षीय पुरुष, कोर्टी येथील 30 वर्षीय पुरुष, शिवडे येथील 32 वर्षीय पुरुष, येळगाव येथील 46 वर्षीय महिला, 16 वर्षाचा युवक., सातारा तालुक्यातील सदरबझार येथील 27, 41, 67, 30, 32, 50, 50 वर्षीय महिला,
68, 70, 29, 62, 35, 52 वर्षीय पुरुष, करंजे/खैरमली येथील 57 वर्षीय पुरुष, वर्ये येथील 48 वर्षीय पुरुष, प्रतापगंज पेठेतील 38 वर्षीय पुरुष, बुधवार पेठेतील 29 वर्षीय महिला व 32 वर्षीय पुरुष, जिहे येथील 38, 45 वर्षीय पुरुष, सैदापूर येथील 36 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 65 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष, पाटखळ येथील 35 वर्षीय महिला., महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर येथील 35 वर्षीय पुरुष, गोडवली, पाचगणी येथील 23 वर्षीय महिला., कोरेगाव तालुक्यातील सासुर्वे येथील 58 वर्षीय महिला.
पाच बाधितांचा मृत्यू
कुमठे ता. कोरेगाव येथील 76 वर्षीय पुरुष व लोणंद ता. खंडाळा येथील 65 वर्षीय महिला, परखंदी ता. वाई येथील 72 वर्षीय पुरुष व कुस बुद्रुक ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष या करोनाबाधितांचा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सोनगाव, क्षेत्रमाहुली येथील 62 वर्षीय महिलेचा सातारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.