वाघोली -वाघोली परिसरात चोरी, घरफोडी करणाऱ्या सराईत चोरास लोणीकंद पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने जेरबंद केले आहे. सुमन उर्फ शिवा शंभू चक्रवर्ती (वय 21, रा. आय व्ही इस्टेट लेबर कॅम्प, वाघोली; मूळ कलकत्ता) असे या आरोपीचे नाव आहे.
लोणीकंद पोलीस ठाण्यात याबाबत दीपक छोटुराम दास (वय 21, रा. गाडेवस्ती, वाघोली) यांनी फिर्याद दिली होती. त्यांच्या घराचे कडी कोयंडा उचकटून 2 मोबाइल व एक ब्लूटूथ असा एकूण 18,290 रुपयांचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरुन नेलेवरून गुन्हा दाखल केला होता. आरोपीस वाघोलीतून ताब्यात घेत एकूण 63,490 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.