नगर -संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. आमदार संग्राम जगताप यांनी संत सावता महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले.
यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, युवकचे शहराध्यक्ष अभिजीत खोसे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर, भिंगार कॅन्टोमेंटचे माजी उपाध्यक्ष मुसा सय्यद, फुले ब्रिगेडचे अध्यक्ष दीपक खेडकर, गौरव मुथा आदी उपस्थित होते.
आ. जगताप म्हणाले की, सावता महाराजांनी ऐहिक जीवनात कर्तव्य कर्मे करीत असताना काया-वाचे-मनेद्वारे ईश्वर भक्ती करता येत असल्याचे स्पष्ट करुन, भक्तीचा खरा मार्ग दाखवला.
त्यांच्या रुपाने जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग मिळाला. त्यांनी अंधश्रध्दा, कर्मठपणेवर प्रहार केला. कर्तव्य व कर्म करीत राहणे ही एकप्रकारे ईश्वरसेवाच असल्याचा त्यांचा संदेश आजही प्रेरणादायी व दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.