मंचर -नोकरीनिमित्त दररोज तालुक्यात ये-जा करणाऱ्यांना गृहविलगीकरणामध्ये कुटुंबासह ठेवावे, तसेच या संबंधित व्यक्तींच्या नोंदी पोलीस पाटलांनी घेऊन तालुका आरोग्य अधिकारी आणि गावाचे तलाठी यांना ती द्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
शहरातून कामासाठी नोकरीनिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात 9975393947 आणि 8600499707 या मोबाइल क्रमांकावर संपर्क नोंदणी करावी. नावनोंदणी न करणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सरपंच दत्ता गांजाळे यांनी नमूद केले.