मुंबई – भारतरत्न, गान कोकिळा, गानसम्राज्ञी, “लतादीदी’ अर्थातच लता मंगेशकर यांचे वयातच्या नव्वदीतही त्यांचे गायन सुरू आहे. तसेच त्या नेहमी सोशल मीडियावर गायना बाबत माहिती देत असतात. त्याचबरोबर लतादीदी आपले मत ट्विट करत सडेतोड ट्विटर मांडत असतात. यातच त्यांच्या ट्विटमुळे त्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहे.
Namaskar. Mujhe ye video kisine bheja, is ladki ne mahan Austrian sangeetkar Mozart ki 40th Symphony G Minor ko Bhartiya Sargam mein bahut sudar tarah se gaaya hai. Main isko aashirwad deti hun ki ye ek acchi gaayika bane. pic.twitter.com/J6u2GyWbCD
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) July 6, 2020
लता दीदींनी ट्विट केले आहे की,’नमस्कार, मला हा व्हिडीओ कुणीतरी पाठवला होता. ही तरुणी महान ऑस्ट्रियन संगीतकार मोझर्थ यांच्या 40 व्या Symphony G Minor ला भारतीय सरगममध्ये खूप सुंदररित्या गायलं आहे. माझा या तरुणीला आशीर्वाद आहे, ही तरुणी खूप चांगली गायिका बनेल”
त्यांनी शेअर केलेल्या व्हिडियोतील तरुणीचे नाव समादीप्ता मुखर्जी असून ती पश्चिम बंगालची राहणारी आहे. सध्या या व्हिडियो सोशल मीडियावर युजर्स द्वारे चांगलीच पसंती मिळत असून समादीप्तानेही लतादीदींच्या ट्वीटवर आपलं मत मांडले आहे. आदरणीय लता मंगेशकरजी, मी तुम्हाला लहानपणापासून पूजते. आज मला खरंच खुद्द देवानेच आशीर्वाद दिला आहे. माझ्यावर तुमचा आशीर्वाद असाच कायम राहू दे, जेणेकरून माझ्या संगीत प्रवासात मी खूप उंचावर पोहोचू शकेन” असं ही म्हणाली आहे.