शिरूर -शिरूर तालुक्यातआज एकाच दिवशी 9 गावात 16 जण करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यातील बरेचसे जण स्थानिक असल्याने चिंतेत भर पडली आहे.
करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने प्रशासनावरील ताण वाढत चालला आहे. शिरूर येथील भूमी अभिलेख कार्यालयात ही एकूण चार कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली असून हे चिंताजनक आहे.
गेल्या आठ दिवसापासून शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहत यातील कामगारही मोठ्या संख्येने करोना पॉझिटिव्ह आढळू लागले आहेत. भाजीविक्रेते, आडतदार, कंपनी कामगार, शासकीय कर्मचारी, शेतकरी यांचाही यामध्ये समावेश आहे.
येथे आढळले रुग्ण
शिरूर तालुक्यातील शिरूर 2, रामलिंग रोड 3, निमगाव म्हाळुंगी 1, कोरेगाव भीमा 1, रांजणगाव गणपती 2, शिक्रापूर 2, गणेगाव खालसा 3,जातेगाव 1, सणसवाडी 1 असे 16 जण करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.