वालचंदनगर -शेळगाव (ता.इंदापूर) येथे गुरुवारी (दि. 2) 5 जणांना करोनाची बाधा झाली होती. त्यानंतर निरा भिमा कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी शेळगाव येथे भेट देत प्रशासनाकडून केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.
यावेळी सर्वानी घरातच राहून काळजी घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी कर्मयोगीचे संचालक राहुल जाधव, आबासाहेब शिंगाडे, तलाठी कपिल थोरात, ग्रामसेवक दत्तात्रय इनामे, पांडुरंग सुपुते, जाफर शेख, सचिन शिंगाडे, संतोष सूर्यवंशी उपस्थित होते.