प्रत्येक कुटुंबात भाजीवरून घरातील लहान मुले आणि ज्येष्ठांचे रोजचे वाद ठरलेले असतात. त्यातही खास लहान मुलांचा त्याच्याशी छत्तीसचा आकडा असतो. भाज्या का खायला हव्यात, त्यांचे फायदे काय आहेत? यासह अनेक गोष्टी समजावून सांगाव्या लागतात. अशाच नावडत्या भाज्यांमध्ये प्रामुख्याने समावेश होणारी भाजी म्हणजे गवार. गवारीची भाजी औषधी आहे. यात प्रोटीन, कार्बोहाइडेट्स, व्हिटॅमिन “के’, “सी’, “ए’ भरपूर प्रमाणात आढळून येतात. फॉस्फरस कॅल्शियम लोह, पोटॅशियम असतात.
1.आरोग्यासोबतच हृदयासाठी गवारीची भाजी गुणकारी मानली जाते. त्यामध्ये आढळून येणारे फायबर शरीरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर संतुलित ठेवण्यासाठी फायद्याचे आहे.
2.त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी गवारीची भाजी मदत करते.
3.गर्भवती महिलांसाठीही गवारीची भाजी अत्यंत लाभदायक आहे. आयर्न आणि कॅल्शिअमची कमतरता पूर्ण करण्यासाठी अनेक गर्भवती महिलांनी गवार खायला हवी, असा सल्ला देण्यात येतो. तसेच गवारीमधील फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन्स बाळाच्या विकासासाठी फायदेशीर कॅल्शियम ठरतात.
4.गवारीची भाजीतील कॅल्शियम, लोह आणि पोटॅशियम हाडांच्या मजबुतीसाठी सहायक ठरतात.
5.गवारीच्या भाजीमध्ये लोह भरपूर प्रमाणात असते. अशक्तपणा, कमी रक्त असल्यास गवार फायदेशीर आहे.
6.डायबिटीज रुग्णांची गवार खाल्ल्यास खूप फायदा होतो. रक्तातील साखरेचा स्तर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
डॉ. आदिती पानसंबळ
आहारतज्ज्ञ, नगर.
संपर्क : 7385728886