लोणी काळभोर -हवेली तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या दोन दिवसांत करोनाने धुमाकूळ घातला आहे. थेऊर, उरुळी कांचन, लोणी काळभोर, कोरेगाव मूळ व कुंजीरवाडी या पाच गावांत तब्बल 14 रुग्ण आढळून आले आहेत. यातील सहा रुग्ण एकट्या थेऊर गावातील आहे. त्यामुळे पूर्व हवेली तालुका करोनाचा हॉटस्पॉट झाला आहे.