शेतीत नांगरणीनंतर जलसिंचन करावे लागते, अगदी तसेच “यशस्वी उद्योजक होण्यासाठी प्रामाणिकपणा आणि निष्ठेचा भावनांचे शिंपण करावे लागते,’ हा यशस्वीतेचा कानमंत्र देणारे आणि त्यासाठी आग्रही असणारे “पप्पा’ हे आमचे आदर्श आहेत. “जयप्रकाश नेमीचंद बोरा’ आमच्या कुटुंबाची ऊर्जा आणि श्वास आहे. शांत, संयमी आणि शून्यातून विश्व निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व.
“एकी हीच कुटुंबाचे बळ असते’ अशी शिकवण देणाऱ्या आमच्या वडिलांना बारामतीसारख्या तालुक्यात “यशस्वी उद्योजक’ ही ओळख निर्माण करताना अडचणी आल्या. एकवेळी तर सर्व काही होत्याचे नव्हते झाले. त्या परिस्थितीतही खचून न जाता त्यांनी जिद्द, चिकाटीच्या जोरावर पुन्हा वैभव उभे केले. यात आई आणि कुटुंबांची मोलाची साथ राहिली आहे. मृदू स्वभाव आणि मदतीची शिकवण यामुळे जनमाणसांसाठी आजही ते “काका’ आहेत.
ग्रामपंचायत सदस्य असताना त्यांनी सर्वांगीण विकास केला. आमचे वडील बारामती जैन समाजाचे उपाध्यक्ष असून, समाजासाठी ते आदर्श व्यक्तिमत्व आहेत. जीवनात यशस्वी होताना त्यांची संस्काराची शिदोरी आम्हांला आणि आता नातवंडांना ते पुरवत आहेत. वडिलांना पितृदिनाच्या शुभेच्छा…
– अभिजीत जयप्रकाश बोरा