नवी दिल्ली: सार्वजनिक इंधन कंपन्यांनी गुरूवारी लिटरमागे पेट्रोलच्या दरात 53 पैशांची, तर डिझेलच्या दरात 64 पैशांची वाढ केली. त्यामुळे सलग बाराव्या दिवशी त्या इंधनांच्या दरवाढीचे सत्र चालू राहिले. त्या 12 दरवाढींमुळे पेट्रोल 6 रूपये 55 पैशांनी, तर डिझेल 7 रूपये 4 पैशांनी महागले आहे.
दोन्ही इंधनांच्या किमतीत दरदिवशी बदल करण्याची प्रक्रिया 82 दिवस बंद होती. ती प्रक्रिया सार्वजनिक कंपन्यांनी 7 जूनपासून सुरू केली. तेव्हापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत सलग वाढ नोंदली गेली आहे. ती दरवाढ संपूर्ण देशासाठी लागू आहे.
मात्र, प्रत्येक राज्यात दोन्ही इंधनांवर वेगवेगळा स्थानिक विक्री कर किंवा व्हॅट आकारला जातो. त्यामुळे राज्याराज्यांत पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे आहेत.