नवी दिल्ली: सार्वजनिक इंधन कंपन्यांनी बुधवारी लिटरमागे पेट्रोलच्या दरात 55 पैशांची तर डिझेलच्या दरात 60 पैशांची वाढ केली. त्यामुळे त्या इंधनांच्या दरात सलग 11 व्या दिवशी वाढ नोंदली गेली. त्या सलग दरवाढींमुळे पेट्रोल 6.02 रुपयांनी तर डिझेल 6 रुपये 40 पैशांनी महागले आहे.
दरदिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत बदल करण्याची प्रक्रिया 82 दिवस थांबलेली होती. ती प्रक्रिया सार्वजनिक कंपन्यांनी 7 जूनपासून पुन्हा सुरू केली. तेव्हापासून सलग दरवाढ झाली आहे.
ती दरवाढ संपूर्ण देशासाठी लागू आहे. मात्र, राज्याराज्यांत त्या इंधनांवरील स्थानिक विक्री कर किंवा व्हॅटची आकारणी वेगवेगळी आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यातील दर भिन्न आहेत.