फ्लोरियन ठरला गोल करणारा सर्वांत युवा खेळाडू
बर्लिन – बुंदेसलीगा फुटबॉल स्पर्धेत बायर्न म्युनिच व बोरसया डर्टमंड या संघांनी आपापले सामने जिंकून अपेक्षेप्रमाणे आगेकूच कायम राखली आहे. बायर्नकडून पराभव झाला असला तरीही लेवरक्युसेन संघाच्या फ्लोरियन वित्झ हा या स्पर्धेच्या इतिहासात गोल करणारा सर्वांत युवा खेळाडू ठरला आहे.
या विजयासाठी बायर्नने स्पर्धेचे सलग आठवे विजेतेपद मिळविण्याच्या दिशेने जोरदार वाटचाल कायम ठेवली आहे. त्यांनी रविवारी झालेल्या लढतीत लेवरक्युसेन संघावर 4-2 अशी सहज मात केली.
बायर्नकडून किंगस्ले कोमन, लियॉन गॉत्झक, सरजी गिनर्बी आणि रॉबर्ट लेव्हाननोवस्की यांनी गोल केले. लेवरक्युसेनला जरी हा सामना गमवावा लागला असला तरीही त्यांच्या फ्लोरियनने केलेला गोल या दोन्ही संघांच्या विजयापेक्षाही जास्त चर्चेत राहिला.
फ्लोरियनने वयाच्या 17 व्या वर्षी गोल करताना या स्पर्धेच्या इतिहासात गोल करणारा सर्वांत युवा खेळाडू ठरण्याचा मान मिळवला. लेवरक्युसेनवीर विजयाच्या जोरावर बायर्नने स्पर्धेतील आजवर झालेल्या 30 सामन्यांत तब्बल 70 गुणांची कमाई करत क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. स्पर्धेतील अन्य सामन्यात डर्टमंडने घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा उठवत हर्ता बर्लिन संघावर 1-0 अशी मात करत क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले.