नगर – महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या तालुका अध्यक्षपदी अशोक कोरडे यांची निवड झाल्याबद्दल माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे नगर जिल्हाध्यक्ष किरण बिडवे, जिल्हा सरचिटनीस मनोज वाघ यांच्याहस्ते अशोक कोरडे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे संपर्क प्रमुख संजय जाईबहार, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब बिडवे, संजय सोनवणे उपस्थित होते.
याप्रसंगी अन्य तालुक्यांच्याही अध्यक्ष पदांच्या निवडी घोषित करण्यात आल्या. राहुरी तालुका अध्यक्ष पदासाठी सुजित कोरडे यांची नियुक्ती करण्यात आली. कोपरगाव तालुक्याच्या अध्यक्षपदी दिलीप जाधव, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष संजय जगताप, संगमनेर तालुका अध्यक्षपदी बाबा जाधव व संजय बिडवे यांची निवड करण्यात आली.