देशातील कोरोनाग्रस्तांचा वाढत आकडा सर्वांसाठीच चिंतेचा विषय बनला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आतापर्यंत लॉक डाऊनचे ४ टप्पे लागू करण्यात आले सद्य परिस्थिती पाहता लॉक डाऊन अजून वाढवला जातो की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. देशव्यापी लॉक डाऊनमुळे देशाचे अर्थचक्र रुतले असून त्याला गती देण्यासाठी मोदी सरकारतर्फे २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज देण्यात आले आहे. मात्र मोदी सरकारने घोषित केलेल्या या पॅकेजवरुन अनेकांनी उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
अशातच मोदी सरकारच्या या पॅकेजवर आता अभिनेता संजय खान यांची मुलगी फराह खान अली हिने देखील प्रतिक्रिया दिली असून या पॅकेजची तुलना तिने रशियन बाहुलीशी केली आहे. “सरकारने २० लाख कोटींची घोषणा केली. ही घोषणा ऐकताच माझ्या डोळ्यांसमोर रशियन बबुष्का बाहुली आली. या बाहुलीला एका मोठ्या खोक्यात ठेवलं जातं. परंतु त्या खोक्यातून एक लहानशी बाहुली बाहेर येते.” अशा आशयाचे ट्विट फराहने केले आहे.
सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारी फराह समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर प्रतिक्रिया देत असते. अशातच आता तिने थेट मोदी सरकारच्या आर्थिक पॅकेजवरच निशाणा साधल्याने तिचे हे ट्विट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
The Govt 20 lac crore package reminds me of the Russian “Babushka dolls”. All grandely wrapped. But keep opening and the smaller it gets. 😀😛😜.
— Farah Khan (@FarahKhanAli) May 28, 2020