शिरूर -शिरूर नगर परिषदेतील स्वच्छता कर्मचारी व कार्यालयीन कर्मचारी यांना गायकवाड हॉस्पिटलच्या वतीने अर्सेनिकम अल्बम 30 या होमोओपॅथिक औषधाचे मोफत वाटप करण्यात आले आहे.
उद्योगपती व सभागृहनेते प्रकाशभाऊ धारिवाल, गायकवाड हॉस्पिटलचे डॉ. प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते 200 कर्मचाऱ्यांना हे औषध देण्यात आले.
कर्मचारी शहरासाठी देवदूत आहेत. त्यांची आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत धारिवाल यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्याधिकारी महेश रोकडे, स्वच्छता आरोग्य सभापती विठ्ठल पवार, पाणीपुरवठा सभापती मुजफ्फर कुरेशी, नगरसेवक मुजफ्फर कुरेशी उपस्थित होते.