वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणूच्या संसर्गाबद्दल एक विचित्र विधान केले आहे. आमच्या देशात सर्वात जास्त कोरोना विषाणूचे संक्रमण असणे आमच्यासाठी सन्मानाचे आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये ते म्हणाले, “जेव्हा आपण असे म्हणता की आम्ही संसर्गाच्या बाबतीत पुढे आहोत, तेव्हा मी ते फार वाईट मानत नाही. याचा अर्थ असा की आपण इतरांपेक्षा जास्त चाचण्या केल्या आहेत. त्यामुळे हि आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. मी त्याच्याकडे एक ‘सन्मान’ म्हणून पाहतो.’
अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत आतापर्यंत कोविड -१९ च्या १५ लाख ७० हजारांहून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत. त्याचवेळी ९३ हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत. त्याखालोखाल रशियाचा क्रमांक लागतो जेथे तीन लाख लोक संक्रमित आहेत.