शिरूर(प्रतिनिधी) : शिरूर तालुका आता ऑरेंज झोन मध्ये गेला असून, शिरूर तालुक्यात प्रतिबंध क्षेत्र सोडून इतर ठिकाणी दिनांक 22 मे पासून सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या दुकाने उघडी राहणार असून, त्यासाठी सोशल डिस्टन्स व गर्दी होऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. याची अंमलबजावणी व्हावी म्हणून शिरूर तालुक्यासह शहरासाठी 22 मे पासून नियमावली व सूचना जाहीर करण्यात आल्याची माहिती तहसीलदार लैला शेख व नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली आहे.
शिरूर तालुका रेड झोन मधून आता ऑरेंज झोनमध्ये आला असल्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. परंतु शासनाने ठरवून दिलेले आदेश व नियमाचे नागरिकांनी, व्यवसायिकांनी पालन करणे गरजेचे आह असे तहसीलदार लैला शेख यांनी सांगितले.
सर्व शाळा कॉलेज, शैक्षणिक प्रशिक्षण ,कोचिंग संस्था बंद राहतील. तथापि दुरुस्थ आणि ऑनलाईन शिक्षण यात सूट असणार आहे. परवानगी असलेल्या सेवा वगळून इतर सेवा म्हणजे हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहतील. फक्त तयार पदार्थाची घरपोच सेवा देणारे हॉटेल सुरू ठेवता येईल परंतु तिथे इतरांना ग्राहकांना बसून जेवणे, मध्यपान इत्यादी सेवा देता येणार नाही. तसेच बस डेपो येथील कॅन्टींग सुरू ठेवता येईल.
सर्व सिनेमा हॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, शॉपिंग मॉल, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, करमणूक, उद्याने, चित्रपट ग्रह, बार आणि सभाग्रह, असेंब्ली हॉल आणि तत्सम ठिकाणी बंद राहतील.
सर्व सामाजिक राजकीय खेळ, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक ,धार्मिक कार्यक्रम मेळावे यांना प्रतिबंध असणार आहे. सर्व धार्मिक स्थळे, पूजेची, प्रार्थनेची ठिकाणे नागरिकांसाठी बंद राहतील तसेच धार्मिक स्थळांवर गर्दी करण्यास नागरिकांना मनाई आहे.
जीवनावश्यक सेवा अत्यावश्यक सेवा वगळता इतर कारणासाठी सामान्य नागरिकांना रात्री 7 ते सकाळी 7 या वेळेत घराबाहेर निघण्यास मनाई करण्यात आली आहे. वैद्यकीय बाबी आणि जिवनावश्यक बाबी वगळता 65 वर्षावरील नागरिक, शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती, गर्भवती महिला, दहा वर्ष पेक्षा लहान वयाची मुले यांना घराबाहेर फिरण्यास मनाई असणार आहे. नागरिकांना ज्या बाबींना प्रतिबंध करण्यात आलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त बाबींसाठी कोणत्याही कारणासाठी परवाना अथवा पास गरज असणार नाही.
स्पोर्ट कॉम्प्लेक्स, स्टेडियम आणि खुल्या जागा या वैयक्तिक व्यक्तींना व्यायामासाठी वापरण्याची मुभा असेल, मात्र अशा जाग्यावर प्रेक्षकांना प्रवेश नसेल ,नागरिकांनी व्यायाम सामाजिक अंतर ठेवून करणे आवश्यक आहे.
दोन चाकी वाहनांवर फक्त एक व्यक्ती तर तीन चाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये चालक सोडून इतर दोन व्यक्तींना प्रवासाची अनुमती परवानगी सह असेल.
जिल्हा अंतर्गत बस सेवा 50% क्षमता सुरू होईल, असा प्रवास सामाजिक अंतर ठेवून करणे आवश्यक आहे मात्र एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातील बस सेवेबाबत शासनस्तरावरून वेगळ्याने आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.
सर्व प्रकारची बाजार दुकाने ही सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहतील मात्र अशा ठिकाणी सामाजिक अंतर पाळले जात नसेल तर असे बाजार दुकाने बंद करण्याबाबत तात्काळ कारवाई करण्यात येणार .हे करण्यापूर्वी सदर जागेची व्हिडिओ शूटिंग करणे अथवा फोटो काढण्याची दक्षता घेण्यात यावी जेणेकरून नंतर ते तक्रारीबाबत वाव राहणार नाही यासाठी काळजी घेणे प्रशासनाने बंधनकारक आहे.
मात्र प्रतिबंधित क्षेत्रात वरील बाबींना मज्जाव असेल आणि आरोग्य विभागाने सुचवल्याप्रमाणे अशा प्रतिबंधित क्षेत्रात फक्त जीवनावश्यक बाबींची दुकाने सुरू असतील. प्रतिबंधित क्षेत्रात बँक, ओपीडी, वैद्यकीय दवाखाने यांचे सहित सर्व प्रकारच्या अस्थापना बंद राहतील.
सद्यस्थितीत मौजे तळेगाव ढमढेरे 8/520 , कारेगाव मधील धील माळवाडी परिसर15/5/20, शिवतक्रार माळुंगी18/5/20, टाकळी भिमा 18/5/20आणि कवठेयेमाई 19/5/20 ही क्षेत्रे त्यापुढील नमूद तारखेपासून 14 दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करणे ली करण्यात आलेली आहे.
सर्व प्रकारची शासकीय कार्यालय सुरू राहतील, तसेच नगरपालिका आणि ग्रामपंचायतीची कार्यालय सुरू राहतील, लॉक डाऊन काळात सर्व प्रकारच्या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जातील याकडे लक्ष द्यावे.
पूर्वाहन गावी पूर्व पावसाळी कामे सुरु ठवण्यात यावी, मात्र हे सर्व करीत असताना सामाजिक अंतर 2 मिटर ठेवण्यात यावे, तसेच लग्न वगैरे यासाठी 50 व्यक्तींच्या मर्यादेत परवानगी देण्यात यावी, आणि त्या ठिकाणी सामाजिक अंतर ठेवले जाईल याची सर्व संबंधिताना लेखी कल्पना परवानगी देण्यापूर्वी देण्यात यावी. अंत्यविधी सारख्या कार्यक्रमात 20 पेक्षा जास्त लोकांना सहभागी होता येणार नाही येणार नाही.
तसेच सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान ,तंबाखू ,गुटखा खाऊन थुंकता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी दारूचे सेवन अनुज्ञेय असणार नाही. दारू विक्रीची दुकाने सुरू असताना एका वेळी त्या ठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्ती ग्राहक म्हणून असणार नाहीत. याची दक्षता घेण्यात यावी. संबंधित दुकानाच्या संबंधाने या सूचनेचे पालन होत नसल्याचे आढळून आल्यास दुकान तात्काळ बंद करण्यात येणार आहे.
या सर्व व नियम व दुकाने उघडून ठेवण्याचा कालावधी दिनांक 22 मे पासून सुरू होणार असून यासाठी शिरूर प्रांत अधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी तहसीलदार शिरुर लैला शेख व मुख्य अधिकारी, शिरुर नगर परिषद, गट विकास अधिकारी, शिरूर तालुका आरोग्य अधिकारी यांना या नियमांचे पालन करून घेण्याचे सांगितले आहे.