पुणे- कोरोनाचा प्रादुर्भावाचे पडसाद शालेय परिक्षांवर उमटले आहे. CBSEच्या परिक्षा या जुलै महिन्यात होणार आहे, असे सांगण्यात आले आहे. मात्र या परिक्षा देत असताना अनेक सुचनांचे पालन विद्यांर्थ्यासोबत त्यांच्या पालकांनाही करावे लागणार आहे.
CBSE ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 1 ते 15 जुलै दरम्यान परिक्षा होणार आहे. परिक्षेच्या वेळापत्रकाबरोबरच त्यांनी विद्यार्थी आणि पालकांसाठी विशेष नियमावलीसुद्धा जाहीर केली आहे.परिक्षेसाठी विद्यार्थ्यांनी सव्वा दहा वाजता सेंटरवर यावे. साडे दहा ला पेपर सुरु होईल, अशी माहिती मंडळाने दिली आहे.
परिक्षा केंद्रात येताना किंवा परिक्षा देताना अनेक नियमांचे पालन करावे लागणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. परिक्षा म्हटलं तर पेन हे येतेच मात्र यावर्षी पेन सोबतच सॅनिटायझर सोबत ठेवावे लागणार आहे.
काही महत्वाच्या सुचना-
-परिक्षा केंदावर अनेक सुचना दिल्या जातील त्याचं पालन करावे लागणार आहे.
– कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जी खबरदारी घेण्याची गरज आहे. त्याची माहिती पालकांनी पाल्यांंना आधिच देणे अपेक्षित आहे.
-सर्व विद्यार्थांना सोशल डिस्टंसींगचे पालन करावे लागणार आहे.
-विद्यार्थांनी नाक, चेहरा झाकला पहिजे. मास्क अनिवार्य केले आहे.
– महत्वाचे म्हणजे पारदर्शक बाटलीमधून सॅनिटायझर आणणे अपेक्षित आहे.
या सगळ्या बाबींचे पालन करुन परिक्षा घेतली जाणार आहे. दरवर्षी अनेक शैक्षणिक सुचना देण्यात येच होत्या मात्र या वर्षी खबरदारीच्या सुचना मंडळाकडून देण्यात आल्या आहेत.