बारामती (प्रतिनिधी) –तालुक्यातील मुर्टी येथे एक कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आला आहे. संक्रमित रुग्ण मुंबई येथून मुर्टी येथे आला असल्याची माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली आहे. बारामतीतील हा अकरावा कोरोना संक्रमित रुग्ण ठरला आहे.
कोरोना संक्रमित रुग्ण मुंबई येथून मुर्टी येथे आपल्या राहत्या घरी आला होता. तो कोरोना संक्रमित आढळल्याने मुर्टी महसूली गावाची सीमा ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा व वाहतुकीस बंदी घालण्यात येत आहे.
आरोग्याची काळजी घ्यावी व लाॅकडॉऊन दरम्यान कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये व प्रशासकीय यंत्रणेस व कायदा व सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे असे आवाहन मुर्टी (ता बारामती) येथील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे .