चाकण -लॉकडाऊनमुळे चाकणसह मेदनकरवाडी, कडाचीवाडी, रासे, भोसे, वाकी, दत्तवाडी आदि भागात गेल्या दोन महिन्यांपासून अडकलेल्या सुमारे हजार परप्रांतीय कामगारांना बुधवारी (दि. 13) खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये एकत्रित बोलावून मूळ गावी रवाना करण्यात आले.
त्यांच्यासाठी 50 एसटी बसची व्यवस्था करण्यात आली होती. तहसीलदार सुचित्रा आमले, प्रांताधिकारी संजय तेली, वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे आदींनी यासाठी पुढाकार घेतला. यावेळी चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, उपनिरीक्षक विजय जगदाळे, विशाल दांडगे, पोलीस हवालदार संजय घाडगे, राजेंद्र चौधरी, तलाठी शाम वालेकर, बाजार समितीचे सहाय्यक सचिव संतोष गायकवाड, मंडलाधिकारी अशोक मडके, बाळासाहेब बोत्रे आदि उपस्थित होते.
सर्व मजुरांची प्रारंभी चाकण ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. प्रशासनाच्या वतीने एक वेळचे जेवण व पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.