पुणे : शहरातील कोंढव्यात ऑनलाईन हुक्का विक्री करणाऱ्या एका वेबसाईटवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली आहे. याविषयी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी माहिती दिली आहे.
दरम्यान, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांना माहिती मिळाली होती. what’s Hot या वेबसाईटवर मोबाईल क्रमांक टाकून हुक्का विक्रीची जाहिरात देण्यात आली होती. सदर माहितीच्या आधारे सहायक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांचे मार्गदर्शनाखाली मिळालेल्या मोबाईल नबरचे आधारे तांत्रिक विश्लेषण करून बनावट ग्राहक द्वारे पोलिस उपनिरीक्षक महाडिक, पो हवा मगर ,गुरव गरुड ,पो ना साबळे, चौधर यांचेसह धर्मादास लुल्लागार्डन लुल्ला नगर कोंढवा तालाबचौक या ठिकाणी सापळा रचून हुक्का विक्रीसाठी घेऊन आलेल्या ३ ताब्यात घेण्यात आले आहे.
मित विजय ओसवाल वय १९ रा. वानवडी बाजार पुणे, रॉयल जयराम मधुरम वय -२८ रा. लुल्लानगर कोंढवा, परमेश महेश ठक्कर वय २४ रा. भवानी पेठ पुणे अशी अटक करण्यात आलेल्या तिघांना अटक केली आहे. दरम्यान, या तिघांची सांगितली यांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्याकडे ६ हुक्का पॉट,६ पाकीट तंबाखूजन्य फ्लेवर,४ मोबाईल फोन, २ मोपेड गाड्या असा एकूण ८४१००/-रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर बाबत कोंढवा पोलीस स्टेशन या ठिकाणी भा.दं.वि क. १८८, २६९, २७०,२७३ , कोटपा अॅक्ट ५,७,२२,राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे क. ५१(१)(ब), महाराष्ट्र कोविड १९ नियम २०२० चे क ११, संसर्गजन्य रोग कायदा १८९७ चे क. ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.