बारामती -चीनमधून भारतात स्थलांतरित होणारे उद्योगांना बारामती परिसरात जागा उपलब्ध करून द्यावी, अशी देण्याची मागणी उद्योजकांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली आहे.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, जेजुरी, कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहतीतील प्रमुख उद्योजकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा संवाद साधला, त्यावेळी मागणी केली आहे.
यात बारामती इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष संभाजी होळकर, भारत फोर्जचे सुशांत पुस्तके, पियाजियोचे जगदीश गंधे, जीटीएन इंजिनीयरींगचे मिश्रा, डायनॅमिक्सचे जितेंद्र जाधव, दौंड तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार, जेजुरी लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष डॉ. रामदास कुटे आदी उद्योजक, पदाधिकारी ऑनलाईन बैठकीमध्ये सहभागी झाले होते