नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. राष्ट्र्पती भवनात कोरोनाचा रुग्ण सापडल्या नंतर आता लोकसभा सचिवालयातही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे. लोकसभा सचिवालयात काम करणाऱ्या एका सफाई कर्मचाऱ्याला कोरोनाचे संक्रमण झाले आहे. त्या कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सचिवालयात घबराटीचे वातावरण आहे.
या सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा देखील संसद भवन परिसरात काम करतो. त्यांचा घरातीत प्रत्येकाची चाचणी करण्यात येणार असून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, देशात आतापर्यंत १८ हजार ६०१ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर ५९० जणांचा या विषाणूने बळी घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल जाहीर केल्या आकडेवरीनुसार देशात १७ हजार ६६५ कोरोनाबाधितांची होती. तर ५५९ जणांचा मृत्यू झाला होता. तर आतापर्यंत ३ हजार २५२ रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत.