शिक्रापूर – करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे असताना, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी गुरुवारी (दि. 9) शिक्रापूर, सणसवाडीसह परिसरात संचलन करीत जनजागृती केली असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या संचलनमध्ये सहायक निरीक्षक नवनाथ रानगट, उपनिरीक्षक किरण भालेकर, सहाय्यक उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण, महेंद्र शिंदे यांसह तब्बल 35 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
या संचालानामध्ये पोलिसांनी देखील दोन व्यक्तींमध्ये विशेष अंतर ठेवत सोशल डिस्टन्सिंग पाळले होते. वाहने देखील जप्त करण्यात येणार आहे, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर आता पोलिसांचे लक्ष असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
यापुढे नागरिकांनी जास्त खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले.