नवी दिल्ली: करोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभर लॉकडाऊन लागू असल्यामुळे जर तुम्हाला कंटाळा आला, तर थोडे धूम्रपान अथवा मद्यपान करू नका. कारण तंबाखू अथवा मद्याच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. तसेच त्याचा मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. ह्या पदार्थांचे व्यसन असणाऱ्या व्यक्तींना तणावाच्या आणि उदास वाटण्याच्या परिस्थितीत तज्ञांची मदत लागू शकते, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
करोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींना वाळीत टाकू नका. तुम्हाला संसर्ग होऊ नये म्हणून जसे सामाजिक विलगीकरण गरजेचे आहे, त्याचप्रमाणे त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. जर आपल्या परिचयात कुणाला संसर्ग झाला असण्याची शक्यता असेल तर त्यांना खबरदारीचे उपाय आणि गरज पडल्यास वैद्यकीय मदत कशी मिळवावी याबद्दल माहिती द्यावी, असेही आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनेमध्ये म्हटले आहे.