नवी दिल्ली – करोनाची चाचणी, आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणि अन्य संबंधित सामग्रीच्या पुरवठ्यासाठी देशांतर्गत वाहतूक मालवाहतुकीच्या विमानांद्वारे केली जाणार आहे. या संदर्भात नागरी विमान वाहतूक मंत्रालय राज्य सरकारांशी समन्वय साधत आहे. आवश्यक सामग्री राज्यांना पुरविण्यासाठी संबंधित पुरवठा संस्थांशी समन्वय साधून एअर इंडिया आणि अलायन्स एअरची विमानसेवा सुरू करण्यात आली आहे.
देशाच्या पूर्व आणि ईशान्य भागांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी, एलायन्स एअरने 29 मार्च रोजी दिल्ली- कोलकाता मार्गावर विमानसेवा चालू करून कोलकाता, गोवाहाटी, दिब्रूगड आणि अगरतलासाठी सामग्रीची वाहतूक केली.
नौदलाच्या विमानाने उत्तर भागात, दिल्ली-चंदीगड-लेह दरम्यान विमानसेवेद्वारे आयसीएमआर व्हीटीएम किट आणि अन्य आवश्यक वस्तू पुरवल्या आहेत.
अलायन्स एअरने एअर इंडियाच्या विमानातून पुण्यासाठी आवश्यक सामग्री मुंबईला पाठवली आहे. मुंबई-दिल्ली-हैदराबाद-चेन्नई-मुंबई आणि हैदराबाद-कोईम्बतूर या मार्गावरील उड्डाणांनी सिमला, ऋषिकेश, लखनौ आणि इंफाळसाठी पुण्याहून “आयसीएमआर’ किट दिल्लीला आणि चेन्नईला नेण्यात आले. आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि पुदुच्चेरीला देखील सामग्री पुरवण्यात आली.