भिगवण- संपूर्ण जगात करोना विषाणूने थैमान घातले आहे. जगातील बलाढ्य देशांनी सुद्धा या समोर हात टेकले आहेत. शासन आता संकटाचा सामना करण्याची तयारी करीत आहे. दौंडचे तहसीलदार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील दत्तकला शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांनी संस्था संकुलात विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी इमारत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.देशातील अनेक नामवंत संस्था
हातभरासाठी पुढे आल्या आहेत. त्यातच हातभार लावण्यासाठी स्वामी-चिंचोली या गावातील दत्तकला शिक्षण संस्था देशसेवेसाठी हातभार लावण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. या संस्थेमध्ये इंजिनीअरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, एमबीए, डिप्लोमा, एसएससी, सीबीएसई आणि ज्युनियर कॉलेज चालविले जातात. दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी दत्तकला शिक्षण संस्थेच्या इमारती विलगीकरण कक्षासाठी देण्याचा मोठा निर्णय देशसेवेसाठी घेतलेला आहे. एकूण 60 खोल्या विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णाय त्यांनी घेतला आहे.