मुंबई – बॉलिवुडमधील आगामी “थलाइवी’ या चित्रपटातील अभिनेत्री कंगणा रणावतचा पहिला लुक टीजर आणि पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. हा चित्रपट तमिळनाडुच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. यात जयललिताच्या भूमिकेत कंगणा झळकणार आहे.
OMG both looks identical, now I can’t wait for the movie.
Dedication level #kangnaranaut ????????
This is #Thalaivi This is #Thalaivi too pic.twitter.com/NGAbVt9K37
— RaviJ (@ravipatel1108) February 23, 2020
या चित्रपटातील भूमिकेसाठी कंगणा कठोर परिश्रम घेत असून चित्रपटाच्या टीझरमधून त्याची झलक दिसून येत आहे. हा टिझर पाहिला असता जयललिताच्या भूमिकेत कंगणा असल्याचे कोणीही ओळखू शकत नाही. यावरूनच या भूमिकेसाठी कंगणाने जोरदार तयारी केली असल्याचे दिसून येते.
दरम्यान, काही काळापूर्वी कंगनाचा या चित्रपटातला लूक व्हायरल करण्यात आला होता. हिरव्या रंगाची कप्तान घातलेल्या वेशात कंगनाचा जयललिता रुपातला फोटो व्हायरल झाला होता. त्यावर अनेक नेटकऱ्यांनी टीकाही केली होती. तिचा प्रोस्थेटिक लूक अनेकांना पसंत पडला नव्हता. पण, आता कंगनाचा अजून एक लूक व्हायरल झाला आहे. या लूकमध्ये ती पांढऱ्या वेशात आणि कपाळावर मोठं कुंकू लावलेल्या रुपात दिसत आहे. विशेष म्हणजे तिचा हा स्मितहास्य असलेला फोटो हुबेहूब जयललिता यांच्या तशाच प्रकारच्या मूळ फोटोसारखा दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी कंगनाच्या या लूकचं कौतुक केलं आहे.
“थलाइवी’ चित्रपट हिंदीसह तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. यात कंगणाशिवाय साउथचा स्टार अरविंद स्वामीही महत्त्वाची भूमिका साकारत आहे. जो एमजीआरची भूमिका साकारत आहे. तसेच प्रकाश राज हे करुणानिधीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.