नवी दिल्ली : मानसिक आरोग्य, सुरक्षित वैद्यकीय उत्पादने आणि इंडियन ऑईल -इस्सॉन मोबीाल यांच्यात सहकार्य असे तीन महत्वाचे करार भारत आणि अमेरिकेत करण्यात आले. दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेत्यांमध्ये भारत अमेरिका यांच्यातील जागतिक भागिदारी वाढवण्याबाबत चर्चा झाली.
मानसिक आणि भावनिक विकासासाठी भारताला अमेरिकेकडून आता धडे घेणे या सहकार्य करारामुळे शक्य होणार आहे. या दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत या दौऱ्याचे फलीत विषद केले.
मोदी म्हणाले, अमेरिका भारत भागिदारीतील प्रत्येक महत्वाच्या पैलूवर आजच्या चर्चेत प्रकाश झोत टाकण्यात आला. संरक्षण आणि सुरक्षा, उर्जा, सामरिक भागिदारी, व्यापार आणि व्यक्तीगत संबंध यांबाबत चर्चा करण्यात आली.
मोदी यांनी भारताला भेट देण्यासाठी वेळ काढल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानले. ट्रम्प म्हणाले, गेले दोन दिवस भअरतातील स्वागताने मी भारावून गेलो आहे. विशेषत: मोटेरा स्टेडियमवरील कार्यक्रम तर विशेषच होता. तो माझा खूप मोठा सन्मान होता. सव्वा लाख लोक माझ्यासाठी जमले होते. ज्या ज्यावेळी मी तुमच्या नावाचा उल्लेख करायचो त्यावेळी ते ओरडायचे. लोकांचे तुमच्यावर प्रेम आहे.
तत्पुर्वी सकाळी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि प्रथम महिला मेलानिया यांचे राष्ट्रपती भवनात पारंपरिक पध्दतीने स्वागत करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्रपती भवानात त्यांना तिरंगी सलामी देण्यात आली. राजघाटावर जाऊन ट्रम्प यांनी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.