वॉशिंग्टन – चीनने प्रभावी उपाययोजना करून करोना रोगाचा प्रसार नियंत्रणात आणण्याचे चांगले काम केले आहे असे कौतुगोद्गार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढले आहेत. या कामात आम्हीही त्यांना मदत करीत आहोत हे सांगण्यासही ते विसरलेले नाहीत.
करोनाच्या संबंधात आम्ही कालच चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी फोनवर सविस्तर चर्चा केली असल्याचेहीं ट्रम्प यांनी म्हटले आहे. दरम्यान चीन मधील करोनाग्रस्त रूग्णांच्या मृत्यूची संख्या 722 वर पोहचली असून बाधितांची संख्या 34 हजार 546 इतकी झाली आहे.
चीनने करोनाच्या नियंत्रणासाठी जागतिक आरोग्य संघटनेचीही मदत घेतली आहे. हे अवघड आव्हान आहे पण ते उत्तम काम करीत आहेत असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. जागतिक दर्जाचे डॉक्टर्स आणि वैद्यकीय पथक चीनला पाठवण्याची तयारीही अमेरिकेने ठेवली आहे.