मेलबर्न : भारतीय सलामीवीर शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियावर ७ विकेटनी मात केली. या विजयासह टी-२० तिरंगी मालिकेत भारतीय संघाने आपले आव्हान कायम राखले आहे.
Magnificent chase by #TeamIndia to beat Australia by 7 wickets 🇮🇳🔥💪 #AUSWvINDW
Scorecard 👉👉 https://t.co/hWFwzXXqpH pic.twitter.com/fUcrUkedro
— BCCI Women (@BCCIWomen) February 8, 2020
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आॅस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना अॅश्ले गार्डनरच्या ५७ चेंडूत (११ चौकार व ३ षटकार) ९३ आणि मैग लानिंगच्या २२ चेंडूत (६ चौकार) ३७ धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत ५ बाद १७३ धावांपर्यत मजल मारली होती. भारतीय संघाकडून दीप्ती शर्माने ४ षटकांत २७ धावा देत २ विकेट घेतल्या. तर, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव आणि हरलीन दयोल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
Ashleigh Gardner's blazing 93 powered Australia to 173/5 in the tri-series T20I against India.
Can Harmanpreet Kaur & Co. chase down the target? #AUSvIND pic.twitter.com/T3oP2gqCul
— ICC (@ICC) February 8, 2020
प्रत्युत्तरात भारतीय महिला संघानी आॅस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले १७४ धावांचे आव्हान ३ विकेटच्या मोबदल्यात १९.४ षटकात पूर्ण केले. भारताकडून शेफाली वर्माने २८ चेंडूत (८ चौकार व १ षटकार) ४९, स्मृती मंधानाने ४८ चेंडूत (७ चौकार) ५५ आणि जेमिमा रोड्रिग्जने १९ चेंडूत (५ चौकार) ३० धावांची खेळी केली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने नाबाद २०(२०) आणि दीप्ती शर्माने नाबाद ११(४) धावा करत भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
5⃣0⃣ and out!
Smriti Mandhana falls after scoring a measured 55.
This game is going down to the wire. 👀#AUSvIND pic.twitter.com/7N75lbj3qR
— ICC (@ICC) February 8, 2020
आॅस्ट्रेलियाकडून एलिस पेरी, निकोला कारे आणि मेगान शट हिने प्रत्येकी १ विकेट घेतली.
या विजयासह भारतीय महिला संघ गुणतालिकेत दुस-या स्थानी पोहचला आहे. प्रथमस्थानी इंग्लंडचा संघ आहे. साखळी फेरीतील अंतिम सामना रविवारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यादरम्यान होणार आहे. या सामन्याच्या निकालावर अंतिम फेरीत कुठला संघ जाईल हे स्पष्ट होईल.