संभल (उत्तर प्रदेश) : संभल जिल्ह्यातील बेहजोई येथे पोलिसाच्या गणवेशात आलेल्यांनी सामुहिक बलात्कार केला. या घटनेनेन उत्तर प्रदेशच्या मोरादाबाद विभागात खळबळ उडाली आहे.
काही माणसे मोटारीतून उतरली. ते जबरदस्तीने घरात घुसले. त्यांनी दरडावत बेकायदा बनवलेली दारू कोठे आहे? असे विचारले. त्यानंतर या बहिणींना पोलिस ठाण्यात चला म्हणून घेऊन गेले.
या दोघींना निर्जन ठिकाणी नेल्यावर त्यांनी आळीपाळीने बलात्कार केला. तेथेच त्यांना सोडून नराधम निघून गेले. हा प्रकार या मुलींनी घरी येऊन सांगितला. त्यावेळी बेहजोई पोलिस ठाण्यात त्यांचे कटुंबीय गेले. त्यावेळी त्यांच्या घरी कोणताही पोलिस पाठवण्यात आले नव्हते, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या मुलींना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.