ऐश्वर्या राय बच्चन पहिल्यापासूनच ग्रेसफुल आहे. ती 46 वर्षांची झाली तरी अजूनही लोक तिच्या एका छबीसाठी वेडे होतात. याची तिलाही जाणीव आहे. मात्र तिचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या ऐश्वर्याच्या डोळ्यावर चक्क चष्मा लावलेला दिसत होता. त्याबाबत तिने स्वतःच खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वी ती पायऱ्यांवरून घसरून पडली होती. यामुळे चेहऱ्यावर थोडी सूज असल्याने तिला चष्मा घालवा लागला. पायऱ्यांवरून पडल्यामुळे तिला थोडा मुका मारही लागला आहे. घराबाहेरच्या पायऱ्यांवरच पडल्यामुळे लगेच उपचार मिळू शकले, असेही तिने सांगितले. सुदैवाने या अपघातात हात-पायाचे हाड मोडले नाही, ही एक चांगली गोष्ट झाली, असेही तिने सांगितले.
आपल्या या अवस्थेतही पुरस्कार स्वीकारला येण्याची तयारी तिने दाखवली. कारण ज्या लोकांसमोर आपण जाणार आहोत, त्यांच्याच मुळे आपल्याला पुरस्कार मिळतो आहे, हे नमूद करण्यासही ती विसरली नाही. मात्र या व्हिडीओच्यावेळी तिचा अपघात झाला नव्हता तर तिच्या तत्कालिक बॉयफ्रेंडकडून मारहाण झाली होती, असे सिनेविश्वातल्या निरीक्षकांचे म्हणणे आहे. हा बॉयफ्रेंड कोण हे सांगायला नको.