नवी दिल्ली – २६ जानेवारी हा दिवस भारतात म्हणून साजरा केला जातो. यंदा देश 71 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जातो. देशाची राजधानी दिल्लीत राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात.
या कार्यक्रमात प्रत्येक राज्यातून चित्ररथ (देखावे ) सादर केले जातात. मात्र यंदाच्या या चित्र रथात पश्चिम बंगाल राज्यातील चित्ररथ सादर केली जाणार नाही. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी सीएए (CAA ) आणि एनसीआर ( NRC) च्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल राज्यातील चित्र रथाच्या सादर करण्याच्या प्रस्ताव वगळला आहे.
यावरून नवा वाद होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल सरकारकडून राज्यातील विकास कार्य , जल संरक्षण, पर्यावरण संरक्षण या थीमवर चित्ररथ सादर करण्याच्या प्रस्ताव केंद्र सरकार कडून आला होता. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर टीका करता आहेत. त्याचबरोबर सुधारित नागरिकत्व कायदा सीएए आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी एनसीआर याविरोधात त्यांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांनी पश्चिम बंगालचा चित्ररथा संदर्भातील प्रस्ताव स्वीकारण्यात न आल्याने आता पुन्हा एका नवीन वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.