मेलबर्न : पहिल्या डावात आव्हानात्मक ४६७ धावा उभारणा-या आॅस्ट्रेलियाने मालिकेतील दुस-या कसोटीत पाहुण्या न्यूझीलंडला पहिल्या डावात १४८ गुंडाळले. त्यानंतर दुस-या डावात फलंदाजी करताना आॅस्ट्रेलियाने तिस-या दिवसअखेर ४५ षटकात ४ बाद १३७ अशी मजल मारली असून एकूण ४५६ धावांची मजबूत आघाडी घेतली आहे.
Our fast bowlers did a magnificent job to put Australia in a dominant position on Day 3 of the Boxing Day Test @MCG
After dismissing New Zealand for 148 in their first innings, our side is 4-137, an overall lead of 456 runs. 🏏👏🙌#AUSvNZL pic.twitter.com/IAv9kAMZwn
— Cricket Australia (@CricketAus) December 28, 2019
दुस-या डावात आॅस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी संयमी फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी ६२ धावा जोडल्या. वॅग्नरने डेविड वाॅर्नरला ३८ धावांवर ब्लंडेलकरवी झेलबाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर जो बर्न्स आणि लबुशेनने दुस-या विकेटसाठी ३८ धावांची भागिदारी केली. लबुशेनला १९ धावांवर टाॅम लाथमने धावबाद केले. त्यानंतर संघाची धावसंख्या ११० असताना जो बर्न्स आणि स्टीव स्मिथ एकामागोमाग बाद झाले. सॅटनरने बीजे वाॅटलिंगकरवी जो बर्न्सला ३५ धावांवर तर वॅग्नरने साउदीकरवी स्मिथला ७ धावांवर बाद केलं. त्यानंतर मैथ्यू वेड आणि ट्रेव्हिस हेडने डाव सावरला व दिवसअखेर आणखी पडझड होऊ दिली नाही. तिस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वेड १५ आणि हेड १२ धावांवर खेळत होता.
DAY THREE COMPLETE here at the MCG and the Kiwis are fighting hard! Australia lead by 456 runs 🏏
🇦🇺 137/4 | https://t.co/ZJLhrbyQyZ#AUSvNZ #cricketnation pic.twitter.com/OT6soJ70w0
— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 28, 2019
तत्पूर्वी, कमिन्स आणि पॅटिन्सनच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने न्यूझीलंडला तिस-या दिवशी पहिल्या डावात अवघ्या १४८ धावांवर गुंडाळत ३१९ धांवाची मजबूत आघाडी घेतली.
New Zealand scored just 104 runs today for the loss eight wickets. They fold on 148.
Australia have decided not to enforce the follow-on!#AUSvNZ SCORECARD: https://t.co/Svt1gqJqBv pic.twitter.com/kLqdCrZ4wc
— ICC (@ICC) December 28, 2019
कालच्या २ बाद ४४ धावसंख्येवरून पुढे खेळताना न्यूझीलंडला आज ३६.५ षटकांत फक्त १०४ धावांची भर घालता आली आणि त्यांचा डाव १४८ वर आटोपला. सलामीवीर टाॅम लाथमने सर्वाधिक ५० धावा केल्या, त्याच्याशिवाय न्यूझीलंडचा एकही फलंदाज मैदानावर तग धरू शकला नाही.
आॅस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने २८ धावांत सर्वाधिक ५ तर जेम्स पॅटिन्सने ३४ धावांत ३ गडी बाद केले. मिचेल स्टार्कने ३० धावा देत २ गडी बाद केले.
तत्पूर्वी, आॅस्ट्रेलियाने पहिल्या डावात ट्रॅविस हेडच्या ११४, स्टीव स्मिथच्या ८५, टिम पेनच्या ७९ आणि लबूशेनच्या ६३ धावांच्या जोरावर ४६७ धावा केल्या होत्या.