कोटा – राजस्थानातील कोटा शहरामधील जे के लोन रुग्णालयामध्ये अवघ्या ४८ तासांमध्ये १० शिशुंचा मृत्यू झाल्याने देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेची नोंद घेताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सदर घटनेची संवेदनशीलतेने नोंद घ्यावी असं म्हंटल होतं. अशातच आज राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बालमृत्यूच्या घटनांबाबत बोलताना, “देशभरातील व राज्यभरातील प्रत्येक रुग्णालयामध्ये दररोज बालमृत्यूच्या घटना घडत असतात. त्यात काही नवीन नाही.” असं विधान केलं आहे.
यावेळी बोलताना गेहलोत यांनी, “एका शिशूचा मृत्यू देखील दुर्भाग्यपूर्ण आहे मात्र राजस्थानमधील बालमृत्यूची यंदाची आकडेवारी गेल्या ६ वर्षांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. यापूर्वी राज्यात प्रत्येक वर्षाला १५०० ते १३०० बालमृत्यू होत असत यंदा मात्र हे प्रमाण ९०० पर्यंत खाली आलं आहे. असं असलं तरी सरकारतर्फे बालमृत्यूबाबत योग्य ती कारवाई सुरु आहे. असा दावा केला.
Rajasthan CM on Kota child deaths: This year has least deaths in last 6 yrs. Even 1 child death is unfortunate.But thr hv been 1500,1300 deaths in a year in past,this year figure is 900.There are daily few deaths in every hospital in state&country,nothing new.Action being taken pic.twitter.com/86oSvPsGA3
— ANI (@ANI) December 28, 2019