मुंबई: नवी मुंबईतील जुही कामोठे गावात राहणारी 37 वर्षीय महिलेला आपल्या पतीने केरोसिन टाकून जाळून टाकले. जेवणात कमी मटण वाढल्यामुळे हा प्रकार घडला. 9 डिसेंबर रोजी हॉस्पिटलमध्ये महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पल्लवी सरोदे (वय 37) ही गृहिणी होती, आरोपी मारुती सरोदे (वय 38) तिचा नवरा नांदेडचा रहिवाशी असून नवी मुंबईमध्ये मजूर करत होता. या जोडप्याला चार अल्पवयीन मुलेही आहेत.
वरिष्ठ निरीक्षक बाबासाहेब तुपे म्हणाले की, 4 डिसेंबर रोजी रात्रीच्या महिलेचा नवरा संतापला कारण तिने कमी प्रमाणात मटण वाढले होते. नवरा दारूच्या नशेत होता, त्याने पत्नीवर रॉकेल शिंपडून तिला पेटवून दिले. जेव्हा मुलांनी मदतीसाठी आवाज उठविला तेव्हा शेजारी तिला वाचविण्यासाठी आले.
शेजारच्या लोकांनी त्यांना नेरुळच्या डॉक्टर डी वाय पाटील रुग्णालयात नेले. दुसर्याच दिवशी जखमी महिलेला सायनच्या रुग्णालयात दाखल केले. 9 डिसेंबर रोजी महिलेने पोलिसांना सांगितले होते की तिच्या नवऱ्याने जबरदस्तीने आग लावली होती.