कांठमाडू : दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरूष आणि महिला संघाने सलग दुस-यांदा दुहेरी सुवर्णपदक मिळवण्याची किमया साधली. या सन्मानार्थ भारताच्या पुरूष आणि महिला संघांना शुक्रवारी भारतीय खो-खो महासंघातर्फे (केकेएफआय) अध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी ५ लाख रूपयांचे रोख पारितोषिक जाहीर केले. २०१६ नंतर भारताने यंदा २०१९ मध्येही भारताने दोन्ही गटात खो-खो मध्ये विजेतेपद मिळवले आहे.
My heartiest congratulations to Indian KHO KHO Men & Women players & support team for winning the 2 Gold Medals for our country in 13th SAG Kathmandu Nepal, where men team defeated Bangladesh and our Women team defeated Nepal!@kirenRijiju @KKFIofficial @IOA_official
— Sudhanshu Mittal (@SudhanshuBJP) December 4, 2019
दरम्यान, दक्षिण आशियाई स्पर्धेत भारतीय पुरूष संघाने खो-खोच्या अंतिम सामन्यात बांगलादेशचा १६-०९ असा एक डाव ०७ गुणांनी पराभव करत सुवर्णपदक पटकावले होते.
तर दुसरीकडे याच स्पर्धेत भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात यजमान नेपाळचा १७-०५ असा १ डाव १२ गुणांनी पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती.