न्याय देताना गडबड नको – सरन्यायाधिश

जोधपूर – हैदराबादमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींचा हैदराबाद पोलिसांनी शुक्रवारी पहाटे इन्काऊंटर
केला. यासंदर्भात बोलताना सरन्यायधिश शरद बोबडे यांनी त्यांच मत व्यक्त केले आहे. जोधपूरमधील कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की ‘न्याय देताना कधीच घाई-गडबड केली जाऊ नये. जर सूडाच्या भावनेने न्याय दिला तर न्याय हा त्याची मूळ न्यायाची भावनाच गमावतो’, असा माझा विश्वास आहे, असे ही ते म्हणाले.

न्याय देताना गडबड नको – राजस्थानातील जोधपूरमध्ये उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्धाटन समारंभासाठी बोबडे आले होते. त्यावेळी कार्यक्रमात बोलताना ते पुढे म्हणाले की, न्याय देताना कधीच सूडाच्या भावनेने दिला जाऊ नये, असे झाल्यास न्यायाचे स्वरूपच नष्ट होते.

Leave A Reply

Your email address will not be published.