नागासाकी, (जपान) – अणु बॉम्बचा वापर हा “गुन्हा’ असल्याचे मत ख्रिश्चन धर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी रविवारी व्यक्त केले. अण्वस्त्रे समाप्त करण्याचे आवाहन त्यांनी हिरोशिमा अणूबॉम्बस्फोटात बचावलेल्यांच्या कुटुंबीयांबरोबरच्या भावनिक बैठकीमध्ये केले.
नागासाकी शहरात अत्यंत प्रतिकात्मक भेटीच्या काही तासांनंतर ही भेट झाली, पोप फ्रान्सिस यांनी येथे अण्वस्त्रांच्याविरोधात मोठी रॅली काढली होती.
दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा शहरावर टाकलेल्या भीषण अणुबॉम्बच्या स्फोटामध्ये 1,40,00 लोक ठार झाले होते. त्यानंतर तीनच दिवसांनी नागासाकी या लष्करी केंद्र असलेल्या शहरावर दुसरा अणुबॉम्ब टाकण्यात आला होता.
“एकाच क्षणात सर्व काही नाश झाला होता आणि मृत्यूच्या एका ब्लॅकहोलने सर्वांना खाऊन टाकले होते. शांत पाण्याच्या खोल तळापासून आजही आम्ही जे आज जिवंत नाहीत, त्यांचे रुदन ऐकत आहोत.’ असे हिरोशिमा येथील पीस मेमोरिअल येथे पोप म्हणाले. खोलवर दृढनिश्चयाने पुन्हा एकदा सांगावे अशी इच्छा आहे की अणुऊर्जेचा वापर हा आजच्या काळात युद्धाच्या उद्देशानेच आहे. हा उद्देश म्हणजे केवळ मानवाच्या सन्मानाविरुद्धच नाही तर सामान्यांच्या घरासाठी कोणत्याही संभाव्य भविष्याविरूद्धही गुन्हा आहे, असेही ते म्हणाले.
पोप यांनी नागासाकी येथेही भेट दिली आणि अणुस्फोटात मरण पावलेल्यांच्या स्मारकावर पुष्पांजली वाहिली. तेथील नोंदवहीमध्ये त्यांनी आपल्या सहवेदनांची नोंदही केली.