पणजी : इफ्फीमधील खुल्या चर्चेचा मंच ‘ओपन फोरम’ ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. हे ओपन फोनमचे 31वे वर्ष आहे. फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडियाने त्याचे आयोजन केले होते. इफ्फीची 50 वर्षांची कारकिर्द आणि प्रगती हाच त्याचा विषय होता.
फेडरेशनचे अध्यक्ष किरण शांताराम यांनी ओपन फोरमचे दिवस वाढवून ते तीनऐवजी सात दिवस करावे अशी सूचना केली. अलेक्झी हे रशियन निर्माते ओपन फोरम मध्ये बोलताना म्हणाले की रशियात भारतीय चित्रपट निर्मितीला 40 टक्के सवलत देण्यात येईल. रशियन चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी इफ्फीने मोठे योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितले. रशियात मोठ्या पडद्यावरील साधारणत: दिडशे चित्रपट दरवर्षी निर्मिले जातात अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.