पिंपळवंडी येथील व्यवहार : लाखमोलाच्या मॅगी बैलांची मिरवणूक
शिक्रापूर- पाबळ (ता. शिरूर) येथील एका शेतकऱ्याच्या बैलाला बैलाची आवड असणाऱ्या एका शेतकऱ्याने तब्बल सोळा लाख एक्कावन्न हजार रुपयांना विकत घेतले आहे. या बैलाची वाजत गाजत मिरवणूक काढून बैलाला आपल्या घरी नेले आहे. या हौशी शेतकऱ्याचा विषय जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
पाबळ येथील पिंपळवंडी येथील शेतकरी अमोल दगडू जाधव व लोहगाव येथील हरीशेठ पवार यांना बैलाची आवड आहे. दोघे बैलांची काळजी घेत बैलांचा सांभाळ करण्यासाठी वर्षानुवर्ष कष्ट घेत आहेत. जातीवंत बैलांचा सांभाळ करतात. त्यांनी तयार केलेल्या मॅगी नावाच्या बैलाला नवलाख ऊब्रा मावळ येथील पंडितमामा जाधव या हौशी शेतकऱ्याने 16 लाख 51 हजार रुपयांना विकत घेतले. पंडितमामा जाधव यांना आवडलेला हा बैल सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
बैलगाडा शर्यती बंदीनंतर काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या शर्यतबंदी झाल्या. परंतु पुन्हा बैलगाडा शर्यती सुरू होतील, या आशेवर आजही अनेक बैलगाडा शौकीन जातीवंत बैलांच्या शोधात असतात. अमोल जाधव व हरीशेठ पवार यांनी सांभाळलेल्या मॅगी बैलाची तब्येत, नजर व काहीशी धावण्याची लखब लक्षात घेऊन नवलाख उंबरे मावळ येथील पंडित मामा जाधव यांनी बैलाला मोठी पसंती दिली. हा बैल आपल्या गोठ्यात असावा, असे मनोमन वाटल्यानंतर त्यांनी मॅगी या लाडक्या बैलासाठी लाखांची किंमत मोजले आहेत.