भारतीय क्रिकेट संघाचे माजी कॅप्टन कपिल देव यांची बॉलिंग जितकी भेदक होती, तितकीच त्यांची बॅटिंगही तडाखेबाज होती. त्याचीच झलक आपल्याला “83′ मध्ये रणवीर सिंहच्या रुपाने बघायला मिळणार आहे. कपिल देव यांची खासियत असलेला “नटराज शॉट’ मैदानावर खेळतानाचा रणवीरचा फोटो नुकताच व्हायरल झाला आहे.
तडाखेबाज चौकार लगावताना एक पाय उचलून मारलेला फटका नटराज मूर्तीशी साधर्म्य दाखवतो, म्हणून या शॉटला “नटराज स्टाईल’ म्हणोनच ओळखले जाते.
कपिल देव यांना “हरियाणा हरिकेन’ म्हटले जाते. आता या “हरियाणा हरिकेन’ची सर्व स्टाईल रणवीरने जशीच्या तशी उचलली आहे. त्यामुळे कपिल देव यांच्या भूमिकेत रणवीर सिंह एकदम फिट दिसतो आहे. क्रिकेटच्या मैदानावरील बॅटिंगच्या सीनचे फोटो रणवीर सिंहने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. “बिकमिंग हरिकेन’ अशी कॅप्शनही त्याने जोडली आहे.
83 च्या वर्ल्डकपच्या विजयावर आधारलेल्या “83’मधील तयारीची काही क्षणचित्रे रणवीरने जून महिन्यात शेअर केली होती. तेंव्हापासूनच्या ट्रेनिंग आणि फिटनेसच्या जोरावर त्याने स्वतःमध्ये कपिल देव आत्मसात केले आहेत. त्याचा हा “83′ पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये रिलीज होतो आहे.