बॉलिवूड सेलिब्रिटीजमध्ये फॅशनेबल कारचे वेड जरा जास्तच आहे. अजय देवगण आणि शाहरुख खानही त्याला अपवाद नाहीत. आता त्यामध्ये दिशा पाटणीचीही भर पडली आहे. दिशाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये ती रेंज रोव्हरच्या सर्वात लेटेस्ट मॉडेलबरोबर उभी असल्याचे दिसते आहे. या कारमधून ड्रायव्हिंग करणे हा एक अतिशय सुंदर अनुभव होता, असे दिशाने म्हटले आहे.
रेंज रोव्हर कारबाबतचा आपला अनुभव शेअर करताना दिशाने कोठेही ही कार आपण विकत घेतली असल्याचे म्हटलेले नाही. मात्र नंतर या रेंज रोव्हर कारच्या रजिस्ट्रेशन पेपरचा फोटोही इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये कार मालकाचे नाव दिशा पाटणी असेच लिहीलेले आहे. याशिवाय कार खरेदी करण्याची तारिख, मॉडेल नाव आणि कारबाबतचा बाकीचा तपशीलही लिहीला आहे.
या आलिशान कारच्या पेट्रोल मॉडेलची किंमत 1.52 कोटी आणि डिझेल मॉडेलची किंमत 1.80 कोटी रुपये इतकी आहे. बॉलिवूडमध्ये रेंज रोव्हर कार बाळगणारी दिशा पाटणी पहिलीच ऍक्टर नाही.
तिच्या आगोदर कतरिना कैफ, अल्लू अर्जुन, अमिताभ बच्चन, संजय दत्त, शाहरुख खान, सलमान खान, आलिया भट यांच्यासारख्या अन्य स्टारकडेही ही महागडी कार आहे.