मुंबई – दिग्दर्शक अनिस बज्मी यांच्या आगामी पागलपंती या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. सध्या हे पोस्टर चांगलेच चर्चेत आले आहे. कारण हा एक मल्टिस्टारर चित्रपट असून यामध्ये अनेक कलाकरांची फौज पहायला मिळत आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम, अर्शद वारसी, अनिल कपूर, पुलकित सम्राट, इलियाना डिक्रुझ, क्रिती खरबंदा, उर्वशी रौतेला आणि सौरभ शुक्ला यांच्या मुख्य भूमिका आहेत.
Presenting the character posters of #Pagalpanti… Directed by Anees Bazmee… 22 Nov 2019 release. pic.twitter.com/oSw9GjuJ3Q
— taran adarsh (@taran_adarsh) October 18, 2019
कॉमेडी ड्रामा असलेल्या ‘पागलपंती’ चित्रपटातील या सर्व कलाकारांचे फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आले आहेत. दरम्यान, चित्रपटाच्या प्रत्येक पोस्टरमध्ये प्रत्येक कलाकाराचे पात्र नेमके कसे आहे, याची झलक पाहायला मिळते. प्रत्येकजण यामध्ये ‘पागलपंती’ करताना दिसतो.’दिमाग मत लगाना क्योंकी इनमे है ही नही’, अशी टॅगलाईन असलेलं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे.
John Abraham, Anil Kapoor, Arshad Warsi, Ileana D’Cruz, Pulkit Samrat, Kriti Kharbanda, Urvashi Rautela and Saurabh Shukla… Teaser poster of #Pagalpanti… Directed by Anees Bazmee… 22 Nov 2019 release. pic.twitter.com/DSOIAVmKoT
— taran adarsh (@taran_adarsh) October 18, 2019
यावरुन चित्रपटात केवळ धमाल पाहायला मिळणार, याचा अंदाज लावता येतो.चित्रपटाच्या निमित्ताने जॉन बऱ्याच दिवसानंतर कॉमेडी चित्रपटात भूमिका साकारत आहे. या चित्रपटात तो ‘राज किशोर’ हे पात्र साकारत आहे.
Presenting the character posters of #Pagalpanti… Directed by Anees Bazmee… 22 Nov 2019 release. pic.twitter.com/t8KbPyakRa
— taran adarsh (@taran_adarsh) October 18, 2019